Official Gazette Notification Text
Official TranscriptRNI No. MAHBIL /2009/37831 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-न वर्ष 22, अंक १६६(२)] मंगळवार, नोव्हेंबर १८, २०२५/कार्तिक २७, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये ९.०० असाधारण क्रमांक ४९४ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मादाम कामा मार्ग,...
RNI No. MAHBIL /2009/37831 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-न वर्ष 22, अंक १६६(२)] मंगळवार, नोव्हेंबर १८, २०२५/कार्तिक २७, शके १९४७ [पृष्ठे २, किंमत: रुपये ९.०० असाधारण क्रमांक ४९४ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक 22 नोव्हेंबर, २०२५. आदेश महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, ९९६३ आणि नियम, ९९६७.
क्रमांक कृबास-०१२५/प्र.क्र.२४१/२१-स.-- ज्याअर्थी, कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा, जि.बुलडाणा या बाजार समितीच्या आस्थापनेवरील PAA मार्केट सेस वसूल केला जातो. परंतु कर्मचार्यांचे वेतन व भत्ते आणि इतर खर्च विचारात घेता, होत असलेली वसुली पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे बाजार समितीच्या निर्दशनास आले आहे. तसेच, बाजार समितीत कायम कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने, गुरांच्या बाजारापासून उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने बाजार समिती बुलडाणा, जि.बुलडाणा यांनी संचालक मंडळाच्या दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या सभेत पारित ठराव क्र.३ नुसार बाजार समिती बुलडाणा यांच्या दुधा उपबाजार येथील गुरेढोरे, शेळ्या, मेंढया व कुक्कटपालनचा बाजार AG करून ठेका पद्धतीने देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, जि.बुलडाणा यांना सादर केला आहे. आणि;
ज्याअर्थी, कृषि उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा, जि.बुलडाणा यांच्या दुधा उपबाजार येथील गुरेढोरे, शेळ्या, मेंढया ब कुक्कटपालनचा बाजार हर्रास करून ठेका पद्धतीने चालविण्यास दिल्यानंतर बाजार समितीचे उत्पन्न वाढणार असल्याने, त्यास परवानगी देण्यासंदर्भातील प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव पणन संचालक, पणन संचालनालय, पुणे यांनी शासनास सादर केला आहे. आणि;
ज्याअर्थी, बुलडाणा कृषि उत्पन्न बाजार समितीने दुधा उपबाजार येथील गुरेढोरे, शेळ्या, मेंढया ब कुक्कटपालनचा बाजार हर्रास करून ठेका पद्धतीने देण्यामागची शासनास सादर केलेली कारणे लक्षात घेता, सदर गुरांचा बाजार हर्रास करून ठेका पद्धतीने देण्यास परवानगी देणे उचित राहणार असल्याची शासनाची खात्री झाली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ५९ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून, सदर कायद्याच्या कलम 32 व महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ खालील नियम १९६७ च्या नियम ३३(१) मधील तरतूदीतून सुट देऊन सन २०२५-२६, २०२६-२७ व २०२७-२८ या आर्थिक वर्षाकरीता कृषि उत्पन्न (१) भाग चार-ब-४१४--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ९८, २०२५/कार्तिक २७, शके १९४७ बाजार समिती, बुलडाणा, जि.बुलडाणा यांच्या दुधा येथील उप बाजारातील गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या व कुक्कटपालनचा बाजार हर्रास करून मार्केट फी, सुपरव्हिजन फी व इतर फी ठेका पद्धतीने देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर मान्यता पुढील अटींच्या अधिन राहून देण्यात येत आहे :-- (१) सन २०२५-२६, २०२६-२७ व २०२७-२८ या आर्थिक वर्षाकरीता कृषि उत्पन्न बाजार समिती बुलडाणा, जि.बुलडाणा यांच्या दुधा उपबाजार येथील गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या A कुक्कटपालनचा बाजार हर्रास करून जाहीर लिलावाने जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्या व्यक्तीस ठेका देण्यात यावा.
(२) मागील ३ वर्षाच्या गुरांच्या बाजारासाठीच्या सरासरी उत्पन्नापेक्षा ३० ते ३५ टक्के रक्कम जास्त मिळत असेल तरच ठेका देण्यांत यावा. (३) सदर ठेक्यासाठीच्या निविदा स्थानिक महत्वाच्या वर्तमानपत्रात जाहीरात देऊन किंवा खुल्या हर्रास पध्दतीने मागविण्यात याव्यात.(ज्याद्वारे बाजार समितीस जास्त उत्पन्न मिळेल त्या पद्धतीचा अवलंब करून).
(४) गुरांच्या बाजारामध्ये काम करणारे कर्मचारी हे ठेकेदारांचे राहतील व त्यांच्या वेतनापोटी बाजार समितीने कोणताही खर्च करु नये. (५) निविदा मागविण्याची व मंजुरी देण्याची प्रक्रिया जिल्हा उप निबंधकांच्या देखरेख व नियंत्रणाखाली करण्यात यावी.
जिल्हा उप निबंधकांनी मान्यता दिल्याशिवाय कोणतीही निविदा अंतिमतः मंजूर करण्यांत येऊ नये. (६) सन २०२७-२८ या कालावधीनंतर शासनाची पुनश्च मान्यता घेतल्याशिवाय ठेका पद्धती कोणत्याही परिस्थितीत चालू न ठेवण्याची जबाबदारी कृषि उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा, जि.बुलडाणा यांच्यावर राहील.
(७) उक्त कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा, जि.बुलडाणा या समितीस दुधा उपबाजार येथील गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या व कुक्कटपालनच्या बाजाराची मार्केट फौ, सुपरव्हिजन फो व इतर फो बसुली ठेका पद्धतीने दिल्यामुळे कोणतीही तक्रार/ न्यायालयीन बाब, इ. उद्भवल्यास सदर मान्यता रद्द करण्याचा अधिकार शासनास राहील व सदर मान्यतेमुळे कोणतीही न्यायालयीन बाब उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कृषि उत्पन्न बाजार समिती, बुलडाणा, जि.बुलडाणा यांची राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, माधवी सं. शिंदे, शासनाचे अवर सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI] SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.